तुम्ही केस थंड पाण्याने धुता की गरम पाण्याने?

हा काय प्रश्न आहे... अशी तुमची कदाचित पहिली रिअॅक्शन असेल... परंतु, नीट विचार करा... तुमच्या केसांना खरंच गरम पाण्याने जास्त फायदा होतो की थंड पाण्यानं...? 

Updated: Nov 24, 2015, 08:11 PM IST
तुम्ही केस थंड पाण्याने धुता की गरम पाण्याने? title=

मुंबई : हा काय प्रश्न आहे... अशी तुमची कदाचित पहिली रिअॅक्शन असेल... परंतु, नीट विचार करा... तुमच्या केसांना खरंच गरम पाण्याने जास्त फायदा होतो की थंड पाण्यानं...? 

केसांचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही तेल, शॅम्पू, कंडीशनर यांची निवड अगदी चोखंदळपणे कराल... पण, यासोबतच केस धुताना पाण्याअचे तापमान सांभाळणेदेखील गरजेचे आहे. कारण अति गरम पाण्याने केस धुणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे केस रफ  होतात तसंच केसगळतीची समस्या वाढते.  

अधिक वाचा - चरबी घटवण्यासाठी या आहेत टिप्स

परंतु, साध्या किंवा थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर आहे. कारण, यामुळे केसांमधील घाण, कचरा व शॅम्पू पूर्णपणे निघण्यास मदत होते. केवळ पाण्याचे तापमान थंड असणे पुरेसे नाही. तर पाण्याचा दर्जादेखील महत्त्वपूर्ण ठरते. 

केस धुताना पाणी जड असू नये... सौम्य पाण्याने केस धुणे अधिक फायदेशीर ठरते. जड पाण्याने केस धुतल्याने केस दाट आणि रफ होतात. तसेच केसांमधील शॅम्पू तसाच राहतो.  त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी ते थंड व सौम्य पाण्याने केस धुवा.

अधिक वाचा - लांब केसांच्या महिलांचे पुरुषांना असते अधिक आकर्षण

गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचे नुकसान होते. जर तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करणे शक्य नसेल कोमट पाण्याचा वापर करावा. मात्र, गरम पाणी अंगावर आणि थंड पाणी केसांवर वापरू नका. पाण्याच्या तापमानात बदल झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाण्याने आंघोळ करणे हा उत्तम पर्याय आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.