दीर्घकाळ जगण्याची इच्छा असेल तर...

नऊ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणं किंवा दिवसातला जास्तीत जास्त वेळ केवळ एका जागेवर बसून घालवणं... अशा कंटाळवाण्या सवयी तुम्हालाही असतील तर तात्काळ बंद करा... कारण, याच सवयी तुमचं आयुष्य घटवतात.

Updated: Dec 11, 2015, 06:01 PM IST
दीर्घकाळ जगण्याची इच्छा असेल तर... title=

सिडनी : नऊ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणं किंवा दिवसातला जास्तीत जास्त वेळ केवळ एका जागेवर बसून घालवणं... अशा कंटाळवाण्या सवयी तुम्हालाही असतील तर तात्काळ बंद करा... कारण, याच सवयी तुमचं आयुष्य घटवतात.

नुकत्याच झालेल्या एका नव्या संशोधनात हा खुलासा करण्यात आलाय. कमी शारीरिक श्रम असणाऱ्या दिनचर्येचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडू शकतो. 

अधिक वाचा - जिन्याचा वापर करण्याचे हे आहेत फायदे

'सॅक्स इन्स्टिट्यूट' या एनजीओनं केलेल्या एका सर्व्हेत ही बाब उघड झालीय. एखादी व्यक्ती रात्री प्रमाणापेक्षा अधिक झोप घेत असेल आणि दिवसा शारीरिकरित्या कमी श्रमाची कामं करत असेल तर अशा व्यक्तीचा मृत्यू लवकर होण्याची शक्यता चार पटीनं अधिक असते. 

अधिक वाचा - सेक्स लाईफ चांगले बनविण्यासाठी हा नैसर्गिक आहार घ्या!

सात तासांपेक्षा जास्त वेळ अधिक बसणं तसंच आठवड्यात १५० मिनिटांपेक्षा कमी व्यायाम करणं या सवयींचा यात उल्लेख आहे. अत्याधिक झोप, जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहणं आणि व्यायाम न करणं याचा तुमच्या शरीरावर खूपच वाईट परिणाम होतो. 

या अभ्यासासाठी २ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या स्वास्थ्याचं आकलन केलं गेलं. या वाईट सवयी आढळणाऱ्या अधिक लोकांमध्ये मधुमेह, कँन्सर आणि हृदयरोगाचं प्रमाण आढळलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.