मुंबई : उसाच्या रसापासून गूळ तयार केला जातो. आपल्या जेवणाता गुळाला विशेष महत्त्व आहे. आयुर्वेदातही गुळाला मोठे महत्त्व आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी गूळ फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन शरीरासाठी आवश्यक असते. जाणून घ्या गुळाचे हे फायदे
फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते - गुळामध्ये सेलोनियम हे तत्व असते जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. यामुळे गळ्याचे तसेच फुफ्फुसांमध्ये इन्फेंक्शन होत नाही. फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते.
कफाच्या त्रासावर गुणकारी - थंडीत कफाचा त्रास अधिक जाणवतो. यावेळी गुळाचा चहा पिणे लाभदायक असते. थंडीच्या दिवसांत गूळ, आलं आणि तुळशीच्या पानांचा काढा प्यावा. यामुळे अनेक आजार दूर राहतात.
सर्दीवर रामबाण उपाय - गूळ आणि तीळ एकत्रित खाल्ल्याने सर्दीचा त्रास होत नाही. यामुळे
अस्थमाचा त्रास दूर होतो - एक कप किसलेला मुळा, गूळ आणि लिंबूचा रस एकत्रित करुन 20 मिनिटे हे मिश्रण शिजवा. हे मिश्रण नियमित खा. अस्थमाच्या त्रासावर हे मिश्रण गुणकारी आहे.