जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने मृत्यू ओढवू शकतो

एकाच जागी बसून टीव्ही पाहणं तुमच्या जीवावर बेतू शकतं, म्हणून जर तुम्ही जास्त टीव्ही पाहत असाल तर आताच टीव्ही पाहणं कमी करा,  कारण ही बाब शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात दिसून आली आहे.

Updated: Jun 26, 2014, 10:14 PM IST
जास्त वेळ टीव्ही पाहिल्याने मृत्यू ओढवू शकतो  title=

न्यूयॉर्क : एकाच जागी बसून टीव्ही पाहणं तुमच्या जीवावर बेतू शकतं, म्हणून जर तुम्ही जास्त टीव्ही पाहत असाल तर आताच टीव्ही पाहणं कमी करा,  कारण ही बाब शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात दिसून आली आहे.

रोज तीन चार तास टीव्ही पाहिल्याने तुमच्या मेंदुतील पेशी हळूहळू मृत्यू पावतात. यामुळे तुम्हाला कधीही मृत्यू येऊ शकतो.

या संबंधिचा अहवाल अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. स्पॅनिश विद्यापीठाच्या 18 हजार पदवीधरांनी मागील 8 वर्षापासून निरीक्षण करून संशोधकांनी हा निष्कर्ष पुढे आला आहे. 

यात 18 हजार विद्यार्थ्यांच्या दररोजच्या कामकाजावर लक्ष ठेवून हा निष्कर्ष निघाला आहे. यात टीव्ही पाहणे, संगणकावर जास्तवेळ काम करणे तसेच वाहन चालवणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
 
यात एक महत्वाची बाब म्हणजे जास्त वेळ एकाच जागी बसल्याने तुम्हाला कधीही मृत्यू ओढवू शकतो. संशोधन करणारे लेखक आणि नावारा विद्यापीठाचे प्राध्यापक मिगेल गोंझालेझ यांनी ही धक्कादायक माहिती प्रसिद्धीला दिली आहे.
                 
ज्या लोकांवर हे संशोधन करण्यात आलं आहे, त्यात 97 लोकांचा मृत्यू झाला. यातील मृत्यू हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबधित कारणांमुळे 19 लोकांचा मृत्यू झाला.

कर्करोगाने 46 लोकांचा मृत्यू झाला तसेच इतर 32 जणांचा मृत्यू इतर आजारांनी झाला. या मृत्यू पावणाऱ्यांमध्ये टीव्ही पाहण्याशी संबंधित लोकांचा समावेश आहे.
 
यासोबतच टीव्ही पाहणे, म्हणजे एकाच जागी बसल्याने शरीराची फार कमी हालचाल होते. स्नायूंनादेखील कोणताही प्रकारचा ताण पडत नसल्याने मृत्यू ओढवतो. 

यात गाडी चालवणे, कम्प्युटरवर काम करणे यात थोडा तरी ताण पडतो. मात्र टीव्ही पाहतांना आपल्याला कोणताही ताण पडत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.