फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा

जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

Updated: Oct 19, 2015, 06:09 PM IST
फिटनेससाठीच नाही तर कँसरपासून बचाव करण्यासाठी वजन घटवा title=

मुंबई: जर आपण लठ्ठपणानं त्रस्त असाल तर कँसरपासून बचाव करण्यासाठी आपल्याला आपलं वजन कमी करावं लागेल. एका नवीन शोधामध्ये हा दावा केलाय. या शोधामध्ये 50 लाखांहून अधिक लोकांच्या आकड्याचं विश्लेषण केलं गेलंय. त्यात लठ्ठपणा आणि कँसरमध्ये संबंध दिसला. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार जर्नल लांसेटमध्ये प्रकाशित एका शोधानुसार दरवर्षी एकट्या ब्रिटनमध्ये 12,000 हून अधिक नवे कँसरचे रुग्ण पुढे येतात, ज्याचं कारण लठ्ठपणा असतं. 

आणखी वाचा - वजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!

संशोधकांनुसार, कोणत्याही व्यक्तीचा (बीएमआय) बॉडी मास इंडेक्समध्ये प्रत्येक 5 अंकाच्या वाढीसोबतच गर्भाशयाच्या कँसरची शक्यताही 62 टक्क्यांनी वाढते. तर किडनी कँसरची शक्यता 25 टक्क्यांनी वाढते. 

एनएचएस सल्लागार आणि वेट लॉस तज्ज्ञ सैली नॉर्टन यांच्या मते, 'अधिकची चरबी आपल्या शरीराच्या मध्यम भागात सहजच जमा होत नाही. तर ती अनेक हार्मोन्स उत्पन्न करते, त्यातील एक इस्ट्रोजन आहे.'

नॉर्टन यांनी सांगितलं, 'रजोनिवृत्तीनंतर जेव्हा अंडाशय हार्मोन स्त्रावित करणं बंद करतं. तेव्हा चरबीच इस्ट्रोजनचा मुख्य स्रोत असते. याचा अर्थ असा की, रजोनिवृत्तीनंतर महिला ज्या लठ्ठ होतात, त्यांच्यामध्ये इस्ट्रोजनमुळे होणाऱ्या ट्यूमरची भीती वाढते.'

आणखी वाचा - वजन कमी करताय? या गैरसमजांपासून दूर राहा!

अतिरिक्त चरबी फक्त स्तन कँसरचं संकट वाढवतं असं नाही, तर ते उपचारांवरही विपरित परिणाम करतं. नॉटर्न यांच्यानुसार '41 टक्के गर्भाशयाचा कँसरचं कारण लठ्ठपणा असू शकतो.'

पुरुषांच्या बाबतीत लठ्ठपणामुळे कोलोन कँसरची भीती वाढते. जवळपास 10 टक्के कोलोन कँसरचा संबंध लठ्ठपणासोबत आहे. याशिवाय लिव्हर कँसरचा सुद्धा लठ्ठपणासोबत संबंध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.