आंब्याचे हे खास गुण आपल्याला माहितीय? आपला मधुमेह होईल गायब!

निसर्ग आपल्याला अनेक आजारांवर उपचार उपलब्ध करून देतो. नैसर्गिक उपचारांचे काही साइड इफेक्ट्स होत नाहीत. टाइप-२ कंडीशन डायबिटीज (मधुमेह)साठी आंब्याची कोवळी पानं आपल्यासाठी संजीवनीचं काम करू शकता. खरंतर, एका स्थितीमध्ये ग्लूकोज वितरणाची मात्रा कायम ठेवण्यासाठी शरीरातील पर्याप्त इंसूलिन उत्सर्जन करण्यासाठी ब्लड शुगर वाढवू शकतं.

Updated: Oct 18, 2015, 06:52 PM IST
आंब्याचे हे खास गुण आपल्याला माहितीय? आपला मधुमेह होईल गायब! title=

मुंबई: निसर्ग आपल्याला अनेक आजारांवर उपचार उपलब्ध करून देतो. नैसर्गिक उपचारांचे काही साइड इफेक्ट्स होत नाहीत. टाइप-२ कंडीशन डायबिटीज (मधुमेह)साठी आंब्याची कोवळी पानं आपल्यासाठी संजीवनीचं काम करू शकता. खरंतर, एका स्थितीमध्ये ग्लूकोज वितरणाची मात्रा कायम ठेवण्यासाठी शरीरातील पर्याप्त इंसूलिन उत्सर्जन करण्यासाठी ब्लड शुगर वाढवू शकतं.

आंब्याच्या पानांचा असा वापर करू शकतो

प्राचीन चीनी औषधांमध्ये आंब्याच्या पानांचा अर्क डायबिटीज आणि अस्थमाच्या उपचारांमध्ये वापरला जायचा. आंब्याच्या पानांमध्ये कॅफिक अॅसिड सारख्या फिनॉलिक, मॅगीफेरिन सारख्या पॉलिफिनॉल्स, गॅलिक अॅसिड, फ्लेवोनोइड्स असे अनेक घटक आढळतात. हे सर्व गुण आंब्याला अँटी-बायोटिक, अँटी ऑक्सीडंट आणि अँटी-अॅलर्जिक नैसर्गिक उत्पादन बनवतात.

आणखी वाचा - आतून-बाहेरून शरीर स्वच्छ करतो कडुनिंब!

आंब्याचे खास गूण:

ब्लड शुगरवर नियंत्रण: असं आंब्याच्या पानांमध्ये असलेल्या टॅनिनमुळे होतं. आंब्याच्या पानांपासून निघालेला अर्क इंसुलिन उत्पादन आणि ग्लूकोजचा प्रसार आणि ब्लड शुगरची मात्रा कमी करतो. 

कोलेस्ट्रॉल कमी करतो: आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की मधुमेह आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अंगांना प्रभावित करतो आणि हृदय त्यातील एक आहे. कोलेस्ट्रॉलचं वाढलेलं प्रमाण आपल्या हृदयाला नुकसान पोहोचवू शकतं. जर आपण मधुमेहानं त्रस्त असेल तर इतर आपोआप खराब व्हायला लागतात. आंब्याच्या पानांमध्ये फायबर, पॅक्टिन आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल खासकरून एलडीएल या हानिकारक कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करतो. याशिवाय फळात असलेल्या फ्लेवोनोविड्स लिपिड लेव्हलही कमी करण्यात मदत होते. यामुळं आपल्या व्हेन्स मजबूत आणि स्वस्थ होतात.

डायबिटीक रेटिनोपॅथीचा उपचार: आंब्याच्या फळासोबतच पानांमध्येही व्हिटॅमिन ए असतं. जे डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे. हेच कारण आहे की, पानंही डोळे खराब होण्यापासून वाचवू शकतात.

किडनी आणि लिव्हरचं आरोग्य: मधुमेहामुळं किडनी फेल होणं खूप सामान्य आहे. अनियंत्रित ब्लड शुगर लेव्हलमुळे ही मोठी समस्या होते. आंब्याचं सेवन केल्यानं ही समस्या कमी होण्यास खूप मदत मिळते. आंब्याच्या पानांमुळे किडनी स्टोन सारखी समस्या दूर होते आणि किडनी आरोग्यवर्धक ठेवण्यासाठी मदत मिळते. याचसोबत आपल्याला पित्ताशयाच्या आजारांपासूनही मुक्ती मिळते. 

अशापद्धतीनं वापरा आंब्याची पानं 
- हलक्या हिरव्या रंगांची छोट्या आकाराची आंब्याची पानं तोडून ती चांगल्या पद्धतीनं धुवून घ्यावी आणि छोटी-छोटी कापून चावावीत.
- आंब्याची पानं तोडून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावीत आणि दुसऱ्या दिवशी खावीत. लक्षात ठेवा उपाशी पोटीच हे खावं.
- पानांना धुवून उन्हात वाळत घाला आणि पावडर बनवून घ्या. एक चमचा हे पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावं. रोज सकाळी याचं सेवन केल्यानं ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. 

आणखी वाचा - रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी का घ्यावे?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.