मान्सूनमध्ये होणारे त्वचेचे आजार आणि त्यावर साधे-सोप्पे उपाय...

सातत्यानं बदलतं हवामान त्वचा रोगांना आपसूकच आमंत्रण देत असतं. पण, साफ-सफाईकडे ध्यान दिलं आणि काही फंगसरोधक सौंर्द्य उत्पादनांचा वापर केला तर आपण त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका करून घेऊ शकतो. 

Updated: Aug 22, 2015, 06:39 PM IST
मान्सूनमध्ये होणारे त्वचेचे आजार आणि त्यावर साधे-सोप्पे उपाय...

मुंबई : सातत्यानं बदलतं हवामान त्वचा रोगांना आपसूकच आमंत्रण देत असतं. पण, साफ-सफाईकडे ध्यान दिलं आणि काही फंगसरोधक सौंर्द्य उत्पादनांचा वापर केला तर आपण त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका करून घेऊ शकतो. 

आज आपण जाणून घेणार आहोत मान्सूनच्या दिवसांत वाढणारे त्वचेचे विकार आणि त्यांवरील उपायांबद्दल

घामोळ्या 

 • दमट वातावणात शरीरावर लाल रंगाच्या घामोळ्यांनी तुम्ही हैराण होऊन जाता. घामामुळे तुमच्या त्वचेची छिद्र बंद होऊन जातात आणि त्यामुळे या घामोळ्या तुम्हाला त्रास देत असतात 

 • तुम्ही घामोळ्यांवर जास्त खाजवल्यामुळे इन्फेक्शन झालं नसेल तर त्या काही दिवसांतच गायब होऊन जातात. 

 • घामोळ्या घालवण्यासाठी तुम्ही सुती आणि सैल कपडे वापरण्याची सवय लावून घ्या. 

 • खूपच खाज येत असेल तर तुम्ही कॅलेमाईन लोशनचा वापर करू शकता.  

नखांमध्ये इन्फेक्शन

 • मान्सून दरम्यान नखांमध्ये फंगस जमा होऊन इन्फेक्शन होण्याचा मोठी शक्यता असते. 

 • अशी नखं रंगहीन आणि तुटलेली असतात.

 • पावसाळ्यात नखं जास्त वाढवू नये. कारणं मोठ्या नखांत लवकर घाण साचते आणि ते साफ करणं कठिण होऊन जातं. त्यामुळेही इन्फेक्शनचा धोका वाढतो. 

 • यावर, सोप्पा उपाय म्हणजे फंगसरोधक क्रिम किंवा पावडरचा वापर करा.

सोरायसिस 

 • या रोगामध्ये त्वचेवर लाल चकत्या दिसू लागतात.

 • यावर कोरफडीचा गर उपयोगी पडू शकतो.

 • चन्याचं पीठ, गुलाबपाणी आणि दूध यांच्या मिश्रणानं बनवलेला लेपही यावर उपयोगी ठरतो. 

 • तसंच बॅक्टेरियारोधक साबण, पावडर आणि फेसवॉशचा वापर करा

पायांना भेगा पडणं किंवा पायांची त्वचा फाटणं

 • बहुतेकदा पाय जास्त काळ ओलसर राहिल्यानं, ओले बूट वापरल्यानं किंवा घट्ट बूट वापरल्यानं ही समस्या जाणवते.

 • या समस्येपासून दूर राहण्यासाठी मान्सूनध्ये प्लास्टिक किंवा चमड्याचे बूट वापरणं टाळा

 • याऐवजी चप्पल किंवा फ्लिप फ्लॉप तुम्ही वापरू शकता. 

 • साफ-सफाईची विशेष काळजी घ्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.