मुंबई : फुफ्फुसांना होणारा आजार सीओपीडी हा मुख्यतः धुरामुळे होतो. या आजारामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही अमेरिका आणि युरोपपेक्षा चार पट जास्त भारतात आहे .
डॉ. सुहास बर्दापूरकर यांच्या म्हण्यानुसार डांसाना पळविण्यासाठी ज्या अगरबत्तीचा वापर करतो, त्या एका अगरबत्तीचा धूर हा शंभर सिगारेट जाळल्यानंतर होणाऱ्या धुरा ऐवढा होतो. यामुळे सीओपीडी हा श्वसनाचा आजार होतो.
डांसाच्या अगरबत्ती व्यतिरिक्त दुसऱ्या औषधांचा वापर करायला हवा.
डासांना मारण्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी म्हणून डांसाची अगरबत्ती लावतो पण हीच अगरबत्ती आपल्या जीवासाठी खूप महागात पडू शकते.
डांसापासून संरक्षण करण्याचे उपायः
- घराघरांमध्ये जास्त दिवसांचा पाण्याचा साठा करून ठेऊ नये.
- झाडाच्या कुंड्यांमध्ये पाणी जमू न देणे.
- रात्रीच्या वेळी बाहेर जाताना पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालून बाहेर पडावे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.