शिळे पदार्थ शरीरासाठी असतात अपायकारक

हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जेवणखाण्याकडे थोडेफार दुर्लक्षच होते. सकाळी अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण खावे लागते. तुम्हालाही रात्रीचे शिळे अन्न सकाळी खाण्याची सवय असेल तर ती लगेचच बदला. कारण असे अन्न तुमच्या शरीरासाठी अपायकारक असते. शिळ्या अन्नात कोणत्याही प्रकारची पोषकतत्वे नसतात. असे अन्न केवळ पोट भरण्याचे काम करते. मात्र अनेकदा शिळ्या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 1, 2016, 11:50 AM IST
शिळे पदार्थ शरीरासाठी असतात अपायकारक title=

मुंबई : हल्लीच्या व्यस्त जीवनशैलीमुळे जेवणखाण्याकडे थोडेफार दुर्लक्षच होते. सकाळी अनेकदा रात्रीचे उरलेले जेवण खावे लागते. तुम्हालाही रात्रीचे शिळे अन्न सकाळी खाण्याची सवय असेल तर ती लगेचच बदला. कारण असे अन्न तुमच्या शरीरासाठी अपायकारक असते. शिळ्या अन्नात कोणत्याही प्रकारची पोषकतत्वे नसतात. असे अन्न केवळ पोट भरण्याचे काम करते. मात्र अनेकदा शिळ्या पदार्थांमुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता आहे. 

शिळे पदार्थ खाल्ल्याने फूड पॉइजनिंग होण्याची शक्यता अधिक असते. शिळ्या अन्नामध्ये बॅक्टेरियांची संख्या अधिक असते. यामुळे फूड पॉइजनिंग होऊ शकते. 

शिळे अन्न खाल्ल्यामुळे पोटाच्या तक्रारीही वाढतात. पाचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पदार्थ बनवल्यानंतर तो दोन तासांतच खा अन्यथा फ्रीजमध्ये ठेवा. 

शिळ्या अन्नात बॅक्टेरियांची वाढ अधिक होत असल्याने उलट्या, अतिसाराचा त्रास होतो. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी नेहमी ताजे अन्न खाल्ले पाहिजे. कधी कधी अशा पदार्थांमुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते.