शांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा!

तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय. 

Updated: Apr 21, 2015, 04:07 PM IST
शांत झोपेसाठी... झोपण्या अगोदर वापरा नारंगी चष्मा! title=

न्यूयॉर्क : तुम्हाला रात्री चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही काळ अगोदर नारंगी चष्मा वापरा.... त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल... असं नुकत्याच एका अध्ययानात स्पष्ट करण्यात आलंय. 

या अभ्यासानुसार, नारंगी रंगाचा चष्मा इलेक्ट्रॉनिक स्क्रिनमधून उत्सर्जित काही निवडक तरंग असलेल्या प्रकाश किरणांना ब्लॉक करतात. त्यामुळे, आपल्या झोपेत लवचिकपणा येतो आणि शांत झोपेसाठी मदत मिळते. 

१३ युवकांनी केलेल्या स्विस या अध्ययनानुसार, या तरुणांनी जेव्हा नारंगी रंगाचे चष्मे लावले तेव्हा यामुळे मेलाटोनिन किरणांचा प्रवाह थांबला. ज्यामुळे, त्यांना चांगली झोप मिळाली. 

या तरुणांनी नियमितपणे रात्री झोपण्यापूर्वी काही तास अगोदर नारंगी चष्मे वापरले. या चष्म्यांच्या वापरण्यावर लक्ष ठेवण्यात आलं. 

हा शोध 'एडोलसेंट हेल्थ' पत्रिकेत प्रकाशित करण्यात आलाय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वयस्कर लोकांवर निळ्या रंगाचा प्रभाव कमी पडतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.