हा सोपा उपाय केला, तर घरातून पाल पळून जाते

पाल हा शब्द घरात कुणी ऐकला तरी सर्वांना पालीची भीती वाटते, पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे.

Updated: Aug 10, 2016, 10:10 PM IST
हा सोपा उपाय केला, तर घरातून पाल पळून जाते title=

मुंबई : पाल हा शब्द घरात कुणी ऐकला तरी सर्वांना पालीची भीती वाटते, पाल अंगावर पडली तर अनेकांना काम फुटतो.पालीला हाकलण्यासाठी विषारी लिक्विड उपलब्ध आहेत, पण त्याच्या वापर करताना कुणी दिसत नाही, विषारी लिक्विड असल्याने ते वापरले जात नसावे.

पालीला घराबाहेब पळवून लावण्यासाठी काही साधे उपाय आहेत, वाचा

१. कॉफी पावडर आणि तंबाखू
कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल, अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल. 

२. डांबर गोळ्या 
डांबर गोळ्या उत्तम किटकनाशक असतात. यांना वॉर्डरोब अथवा वॉशबेसिनमध्ये टाका. पाल येणार नाही.

३. मोरपंख
पालींना मोरपंख पाहून साप असल्याचा भास होतो, असे म्हणतात. साप त्यांना खाऊन टाकेल या भीतीने त्या तेथून पळ काढतात. घराच्या फ्लॉवरपॉटमध्ये मोरपंख ठेवा, पाली पळून जातात.

४. पेपर पेस्टीसाईड्स स्प्रे
पाणी आणि काळी मिरची पावडर एकत्र करा आणि एक पेस्टीसाईड तयार करा. याला किचन, बाथरुम आणि इत्यादी ठिकाणी शिंपडून द्या. या वासाने पाल पळून जाते.

५. बर्फाचे थंड पाणी
बर्फाचे थंड पाणी पालीवर फेका. असे अनेक दिवस करत रहा. थंडावा सहन न झाल्याने पाल घर सोडून देईल.

६. कांदा
कांदा कापा आणि त्याला स्लाईसमध्ये लाईटजवळ टांगून द्या. यामुळे लाईटजवळ ठाण मांडून बसणारी पाल पळून जाईल. कांद्यात असणाऱ्या सल्फरमुळे त्यातून खूप दुर्गंधी येते आणि पाल पळून जाते.

७. अंड्याचे कवच
अंड्याच्या कवचाला अजिबात सुगंध नसतो, पण अंड्याला पाहून पालीला वाटते की हा कोणतातरी जीव आहे, आणि तो तिला हानी पोहचवू शकतो. या भीतीमुळे पाल पळून जाते.

८. लसूण
एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात कांद्याचा रस आणि पाणी भरुन घ्या. या त्या पाण्यात लसुणचा रस मिसळा. जिथे जिथे पाल येते तिथे तो रस स्प्रे करा. पालीला हा वास असह्य होतो. पाल पळ काढते.