मुंबई : खेळताना, मस्ती करताना किंवा कधी कधी अपघातामुळे आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर झालेल्या जखमा आपल्याला दीर्घकाळ त्रासदायक ठरतात. आपलं सौदर्यही उणीवा राहतात.
पण, आम्ही तुम्हाला सांगतोय काही सोप्या टिप्स ज्या तुम्ही घरच्या घरी ट्राय करू शकता.
बटाट्याची सालं
बटाट्याच्या सालांमध्ये अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म आढळतो. त्यामुळे जखम लवकर बरी होते. यासाठी बटाट्याची साल काढून ती केवळ जखमेवर लावा. तुम्ही झटपट आराम मिळवण्यासाठी ही साल बॅन्डेज म्हणून बांधून ठेवू शकता.
लिंबू आणि टोमॅटोचा रस
जखम साध्या पाण्याने धुवून घ्या... जखमेवर काही तास ओला आणि स्वच्छ कपडा ठेवा... काही तासाने ताज्या लिंबाच्या रसात बुडवलेला वॉश क्लोथ जखमेवर ठेवा... त्वचा सुकल्यानंतर तुम्ही त्यावर टोमॅटोचा रसही लावू शकता. असे नियमित दिवसातून दोनदा केल्यास तुम्हांला नक्कीच जखमेच्या व्रणांपासून सुटका मिळेल. लिंबातील अॅसिडिक घटक नैसर्गिकरित्या व्रणांचे डाग हलके करतात तर ताज्या टोमॅटोच्या रसामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने व्रण कमी होण्यास मदत होते.
बदामाचं तेल
बदामाचं तेल जखमेवर लावल्यास तुम्हांला त्यापासून लवकर आराम मिळेल. दिवसातून दोनदा हे तेल जखमेवर लावून हलका मसाज करावा.
मेथीचे दाणे
मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी त्याची पेस्ट बनवा. तयार पेस्ट जखमेवर लावा व पूर्ण सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. मेथीप्रमाणेच हळदीची पेस्ट बनवून लावल्यास जखम लवकर भरण्यास तसेच त्याचे व्रण दूर होण्यास मदत होते.
लव्हेंडर ऑईल
हे तेल दाहशामक असल्याने तसेच जखम भरून काढण्यास मदत करतात. जखम झाल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही लव्हेंडर ऑईल लावाल तेवढी व्रण पडण्याची शक्यता कमी होते. जखम खूपच मोठी असल्यास, कापडाच्या बोळ्यावर तेल घालून ते काही ठराविक तासाने पुन्हा लावा.
बार्ली, हळद आणि दही
बार्ली, हळद आणि दही समप्रमाणात घेऊन त्याचे मिश्रण बनवा. तयार मिश्रण हलक्या हाताने जखमेवर लावा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.