न्यूयॉर्क: जर स्वत:ला खुश ठेवायचं असेल, तर दु:खद चित्रपट पाहणं टाळा आणि सत्य घटनांवर आधारीत चित्रपट पाहा.
एका नव्या रिसर्चवरून हे समोर आलं आहे. काल्पनिक कथांऐवजी सत्य कथांवर आधारीत चित्रपट पाहिले तर प्रेक्षक भावनात्मक दृष्ट्या मजबूत होतात.
मॅसाचुसेटसच्या ब्रेंडिस विद्यापिठाच्या ई.जे.इबर्ट आणि न्यूयॉर्क विद्यापिठाच्या टॉम मेविस यांच्या मते, जर लोकांना वाचायचं असेल तर दुखी कहाणी वाचा, कारण त्यामुळे त्यांना हे काल्पनिक वाटेल, कारण प्रत्यक्षात पडद्यावर साकारल्या जाणाऱ्या नाटकीय दृश्यांपेक्षा वाचनात तुम्ही दु:खी होणार नाहीत.
तसेच काल्पनिकता दुखद कथेचा प्रभाव कमी करत नाही, मात्र सत्य घटनेच्या तुलनेत वाचकांना अशा कथा कमी दु:खी करतात.यासाठी रिसर्च टीमने लोकांच्या दोन गटांचं अध्ययन केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.