हा गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सची भूकही संपते

 सलग तीन मिनीटांपर्यंत टायल मॅचिंग पझल व्हिडिओ गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सचीही भूक कमी होऊ शकते. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. एवढंच नव्हे तर हा 

Updated: Aug 16, 2015, 06:31 PM IST
हा गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सची भूकही संपते title=

लंडन:  सलग तीन मिनीटांपर्यंत टायल मॅचिंग पझल व्हिडिओ गेम खेळल्यानं नशा, जेवण आणि सेक्सचीही भूक कमी होऊ शकते. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय. एवढंच नव्हे तर हा 

या सर्व्हे अंतर्गत वेगवेगळ्या वेळी टेटरिस नावाचा व्हिडिओ गेम खेळायला दिला गेला. यादरम्यान त्यांच्या विविध इच्छांवर लक्ष ठेवलं गेलं. संशोधकांना आढळलं टेटरिस गेम खेळल्यानं लोकांच्या भूकेवर परिणाम होतोय. सिगारेट-दारू,कॉफी पिणं आणि सेक्सची इच्छेवर परिणाम होतोय. या लोकांना हा गेम सलग सात दिवस खेळायला देण्यात आला. सातही दिवस गेम खेळत असतांना हा निष्कर्ष कायम राहिला.

प्लायमाउथ विश्वविद्यालयाचे प्राध्यापक जॅकी अँड्रेड यांनी सांगितलं, 'उत्साह-चिंता किंवा भूक, इच्छेत एक खास प्रकारचा पदार्थ ग्रहण करणं किंवा एक खास क्रिया करण्याच्या कल्पनेता समावेश असतो. टेटरिस सारखेच रोमांचकार गेम मानसिक प्रक्रियेवर आपलं वर्चस्व मिळवतात. टेटरिस गेम खेळत असतांना दुसऱ्या गोष्टीबद्दल विचार करणं कठीण असतं.'

या अभ्यासासाठी १८ ते २७ वयोगटातील ग्रॅज्युएशन करणारे ३१ तरुणांना एका दिवसांत आपल्याला होणाऱ्या इच्छांबद्दल सांगण्यात आलं. हा शोध एडिक्टिव्ह विटॅवियर्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. 

(एजंसी इनपूटसह)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.