मुंबई : दिवसभर थकल्यानंतर आनंदाने आपण बेडमध्ये आराम करण्यासाठी जातो. पण झोप येण्याचे नाव घेत नाही. याचे कधी कारण तुम्ही जाणून घेतले का? याचे कोणतेही कारण असू शकते, त्याबद्दल तुम्ही विचारही केला नसेल. तुम्ही पुढील काही चुका तर करत नाही ना.
१) अंथरूणावर झोपले आहात आणि त्या अवस्थेत तुमच्या हातात स्मार्टफोन किंवा लॅपटॉप, आयपॅडवर काम सुरू असेल तर तुम्हांला झोप येणार नाही. कम्प्युटर, फोन, टॅबलेट सारख्या उपकरणात निळा प्रकाश निघतो, त्यामुळे शरिरात त्या हॉर्मोन्सला बनू देत नाही ज्यामुळे तुम्हांला झोप येते. (सोर्स हेल्थ.कॉम)
अधिक वाचा : 'थायरॉइड'बद्दल या ८ महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहिती हव्या!
२) तुम्ही ऑफिसमधून काही काम घरी आणले असेल किंवा अभ्यास करत असाल तर झोपण्यात आणि हे काम करण्यात सुमारे ३० मिनिटाचे अंतर असायला हवे. झोपताना याच कामाचा विचार घोळत असतो त्यामुळे तुम्हांला झोप लागत नाही. तसेच रात्री झोपण्यापूर्वी इमेल चेक करू नका. त्यात असे काही लिहिले असेल त्याने तुम्हांला टेन्शन येऊ शकते.
३) तुम्ही झोपण्यापूर्वी एखादे औषध किंवा गोळी घेत असाल आणि त्यामुळे झोप लागत नसेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झोप न येण्याचे हे देखील एक कारण असू शकते. काही औषध असे असतात की ते मेंदुला एका ठिकाणी गुंतवून ठेवतात. किंवा पोटात गडबड निर्माण करतात. त्यामुळे तुम्ही झोपू शकत नाही.
अधिक वाचा : सेक्स लाईफ सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त
४) सामान्यपणे असे मानले जाते की झोपण्यापूर्वी व्यायाम केल्याने झोप पळून जाते. पण थोडाफार ताकदीचा व्यायाम केला तर चांगली झोप येऊ शकते.
५) झोपायला जाण्यापूर्वी मित्रपरिवाराशी किंवा सामुहिक चॅट करण्याची चुकी करू नका. तुम्ही सर्वांना गुड नाइट म्हणाल पण समोरच्या व्यक्तीचे उत्तर आले तर तुमची झोप मोडण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : भारतीय जोडीदार ट्राय करताहेत कामसूत्र सेक्स पोझिशन
६) झोपण्यापूर्वी टीव्ही पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याचा निर्णय खूप वाइट असते. काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हांला बराच वेळ जागं ठेवेल आणि पुन्हा झोप येणार नाही.
७) तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्यासोबत झोपत असाल तर असे करण्याची सवय लवकर सोडा. कुत्रे किंवा मांजरींसोबत झोपणाऱ्यांची झोप कमी होते असते. कारण जनावरे रात्रभर हालचाल करत असतात.
८) आपल्या रूमचे तापमान जास्त करून झोपत असाल तर त्याला थोडे कमी करून झोपा. शरीराचे तापमान रात्रभरात कमी होते. त्यामुळे पांघरूण घेऊन झोपल्यास तुम्हांला चांगली झोप येईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.