नवी दिल्ली : आपण जितके लक्ष चेहरा, केसांच्या आरोग्याकडे देतो तितके लक्ष पायांवर देत नाहीत. अनेकदा पायांची नीट काळजी न घेतल्याने टाचा फुटण्याची समस्या उद्भवू शकते.
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी झाल्याने ही समस्या अधिक जाणवते. उन्हाळ्यात शरीराची त्वचा कोमल राहते. मात्र थंडीत असे नसते. पाण्याच्या कमतरतेमुळे टाचा फुटतात. यासाठी तेल मालिश गुणकारी ठरते.
यासाठी काळे मीठ फारच फायदेशीर ठरते. काळं मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. तसेच केसही मऊ राहतात. अनेक साबण, मास्क, टोनर तसेत क्लिंझरमध्ये काळ्या मिठाचा वापर केलेला असतो.
काळं मीठ स्क्रब आणि टोनरसारखेही काम करते. यासाठी एक चमचा बारीक काळं मीठ घ्या त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल टाकून पेस्ट बनवा. हे मिश्रण स्क्रबसारखे चेहऱ्याला लावा. त्वचा स्वच्छ होईल.