केवळ २० दिवसांत वजन वाढवण्याचे सोपे उपाय

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वजन वाढणे, वजन कमी असणे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललीये. तुमचेही वजन कमी असल्यास ते वाढवण्यासाठी हे आहेत काही उपाय

Updated: Jul 5, 2016, 10:17 AM IST
केवळ २० दिवसांत वजन वाढवण्याचे सोपे उपाय title=

मुंबई : हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे वजन वाढणे, वजन कमी असणे ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललीये. तुमचेही वजन कमी असल्यास ते वाढवण्यासाठी हे आहेत काही उपाय

कॅलरीवर लक्ष

वजन वाढवायचे असल्यास शरीरात किती प्रमाणात कॅलरी जातात याकडे लक्ष देणे आवश्यक असते. नियमित कॅलरीमध्ये आणखी ५०० कॅलरी अतिरिक्त प्रमाणात शरीरात गेल्यास वजन वाढण्यास मदत होते. 

दूध आणि सुकामेवा खाणे फायदेशीर

वजन वाढण्यासाठी आहारात एक ग्लास दूध केळे अथवा सुकामेव्यासह घ्यावे. तसेच मुबलक प्रमाणात हिरव्या भाज्या, फळे, चीझ, अंडे,चिकन यांचाही आहारात समावेश करावा. 

योग्य प्रमाणात पाणी

आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. 

योग्य झोप

चांगल्या आरोग्यासाठी तसेच वजन वाढवायचे असल्यास पुरेशी झोप घेणे गरजेचे असते. दिवसांतून कमीत कमी आठ तासांची झोप आवश्यक असते. 

व्यायाम महत्त्वाचा

आरोग्य उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचा. वजन वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करताना वजन उचलण्याचा व्यायाम करावा.