VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...

टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. 

Updated: Aug 6, 2016, 08:17 PM IST
VIDEO : तुमच्या मुलांनी कॉन्डोमला 'कॅन्डी' समजून तोंडात घालू नये म्हणून...  title=

मुंबई : टीव्ही, इंटरनेट किंवा आजुबाजुच्या वातावरणाचा लहान मुलांच्या मनावर कसा आणि कधी परिणाम होईल हे सांगता येत नाही. यामुळेच, सेक्स या बहुतेकदा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयाबद्दल तर मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. 

या प्रश्नांचं निरसन केलं नाही तर त्याचे वेगळेच परिणामही पाहायला मिळू शकतात. हे टाळण्याचा प्रयत्न होतोय इंटरनेटवर...  यशराज फिल्म्सची 'सेक्स चाट विथ पप्पू अॅन्ड पापा' ही वेब सीरिज सध्या चांगलीच प्रसिद्ध झालीय. 

लहान मुलांना विश्वासात घेऊन त्यांना काही गोष्टी योग्य वेळीच समजावून सांगितल्या जायला हव्यात.