वजन कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय

लठ्ठपणामुळे शरीर हे अनेक रोगांचे घर असते. लठ्ठपणा वाढविल्याने अनेक प्रकारचे रोग फार लवकर होऊ शकतात. लठ्ठपणा म्हणजेच शरीराची अधिक चरबी वाढणे. तुम्ही जिमला नाही जाऊ शकला तरीही घाबरण्याचे कारण नाही. कारण तुम्ही घरीच आपले वजन कमी करू शकतात.

Updated: Nov 30, 2015, 04:32 PM IST
वजन कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय  title=

मुंबई : लठ्ठपणामुळे शरीर हे अनेक रोगांचे घर असते. लठ्ठपणा वाढविल्याने अनेक प्रकारचे रोग फार लवकर होऊ शकतात. लठ्ठपणा म्हणजेच शरीराची अधिक चरबी वाढणे. तुम्ही जिमला नाही जाऊ शकला तरीही घाबरण्याचे कारण नाही. कारण तुम्ही घरीच आपले वजन कमी करू शकतात.

यासाठी फक्त तुम्हांला काही घरगुती उपाय करण्याची गरज आहे. 

वजन कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय 

- सकाळची सुरूवात कोमट पाणी पिऊन करा. 

तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकुन ही पिऊ शकतात. हा एखाद्या जादूसारखा उपाय करतो याने पचनक्रिया सुधारते तसेच अतिरिक्त कॅलरी बर्न होतात.

- खाण्यासाठी एक डायरी बनवा. 
तुम्ही काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही खाल्ले पाहिजे यासाठी एक डायरी बनवा. त्यामुळे अतिरिक्त खाण्यासोबतच जंक फुड्स खाण्यावर आळा बसेल.  मागच्या महिन्यापेक्षा तुमचे वजन किती कमी झाले यांची ही नोंद करा. यामुळे तुमचे वजन कमी झाले की नाही हे सुद्धा कळेल आणि तुम्ही हेल्दी जेवण घेऊ शकाल. 

- घरी वजन कमी करण्यासाठी डान्स करा.

दिवसांतून फक्त १० मिनिट डान्स केल्याने जवळजवळ ५८ टक्के कॅलरी बर्न होतात. यासाठी वजन कमी करण्यासाठी डान्स सुरू करा.   

- जेवणामध्ये मसाल्याचा वापर करा.
जास्त पाणी प्या. जेवढे जास्त पाणी प्याल तेवढेच लवकर वजन कमी होईल. पाणी शरीराला नको असणारे घटक बाहेर काढतात आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.