पत्नीचा सेक्ससाठी नकार; पतीनं बनवली 'तिच्या' कारणांची लिस्ट

यापुढे, जेव्हा जेव्हा तुमच्या पतीला सेक्ससाठी तुम्ही नकार द्याल तेव्हा तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या जवळपास एखादा कागद तर नाही ना!

Updated: Jul 25, 2014, 03:00 PM IST
 title=

लंडन : यापुढे, जेव्हा जेव्हा तुमच्या पतीला सेक्ससाठी तुम्ही नकार द्याल तेव्हा तेव्हा या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्या जवळपास एखादा कागद तर नाही ना!

ते यासाठी कारण एका व्यक्तीनं आपल्या पत्नीनं सेक्ससाठी नकार दिल्यानंतर तीन कॉलम असलेली एक यादीच तयार केली. सहा आठवड्यांच्या काळात त्याच्या पत्नीनं त्याला सेक्स टाळण्यासाठी काय काय कारणं दिली याची ही यादी आहे.    

एका रिपोर्टनुसार, पहिल्या ओळीत या व्यक्तीनं तारखेचा उल्लेख केला होता, जेव्हा जेव्हा त्यानं त्याच्या पत्नीला सेक्ससाठी विचारणा केली... दुसऱ्या ओळीत त्यावर पत्नीची प्रतिक्रिया आणि तिसऱ्या ओळीत पत्नीनं नकार देण्यासाठी काय काय कारणं दिली याचा उल्लेख या लिस्टमध्ये केलाय. 

या लिस्टनुसार, या व्यक्तीनं सहा आठवड्यांतून 27 वेळा याबद्दल पत्नीकडे विचारणा केली. यापैंकी केवळ तीन वेळाच त्याला त्याच्या पत्नीनं सकारात्मक प्रतिसाद दिला. ही लिस्ट एका वेबसाईटवर जाहीर करण्यात आली होती. पण, आता ही पोस्ट ‘लॉक’मध्ये बदलली गेलीय. 

या पोस्टवर इतर युझर्सच्याही काही मजेशीर प्रतिक्रिया मिळाल्यात. यापैंकी काही पतीच्या बाजुनं होत्या तर काही पत्नीच्या...
यावर, एकानं प्रतिक्रिया देताना ‘जर मला कुणी अनेकदा सेक्स करण्यासाठी नकार देत असेल तर मी असं समजेल की ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करत नाही’ असं म्हटलंय.  

तर आणखी एका युझरनं ‘जर कुणी सेक्ससाठी नकार देण्याच्या कारणांची अशी लिस्ट बनवत असेल तर मी त्याच्यासोबत कदापि सेक्स करणार नाही... उलट, मी त्याचं थोबाड फोडेन’

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.