Winter Tips: सर्दी, पडशापासून दूर राहण्याचे तीन उत्तम उपाय

हिवाळा सुरू झालाय... आता कडाक्याची थंडीही पडू लागलीय. अशातच तुम्हा-आम्हा सर्वांनाच घसा दुखणे, ताप, वाहतं नाक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण शांत राहा, या साध्या सोप्या तीन टीप्स आहेत, ज्यामुळं आपण सर्दी, पडशापासून वाचू शकतो. 

Updated: Dec 15, 2014, 02:55 PM IST
Winter Tips: सर्दी, पडशापासून दूर राहण्याचे तीन उत्तम उपाय title=

मुंबई: हिवाळा सुरू झालाय... आता कडाक्याची थंडीही पडू लागलीय. अशातच तुम्हा-आम्हा सर्वांनाच घसा दुखणे, ताप, वाहतं नाक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण शांत राहा, या साध्या सोप्या तीन टीप्स आहेत, ज्यामुळं आपण सर्दी, पडशापासून वाचू शकतो. 

आपले हात स्वच्छ ठेवा: आपले हात वारंवार धुवा. साबण, हँडवॉशचा वापर करून जंतूंपासून आपले हात स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना सर्दी, खोकला झालाय अशा व्यक्तींच्या हातांना तुम्ही हात लावल्यानंतर नक्कीच हात स्वच्छ धुवा. 

तसंच बाथरूमचा वापर केल्यानंतरही हात धुवायला विसरू नका. 

निरोगी अन्न खा: निरोगी आणि न्युट्रीशिअस जेवण जेवा. तसंच भरपूर ताजी फळं आणि भाज्या खा. त्यामुळं तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होईल आणि सर्दी, पडशापासून तुम्हाला दूर राहता येईल.  

नियमित स्वच्छता: जर तुम्हाला तापापासून वाचायचं असेल तर आपलं घर स्वच्छ ठेवा (बाथरूम, बेडरूम, फर्नीचर इत्यादी) तसंच तुमचा फोनही स्वच्छ ठेवा.  

तुमचा फोन प्रत्येक दुसऱ्या दिवशी स्वच्छ करावा, त्यासाठी किंचित ओलसर कापडाचा वापर करावा. सर्वजण फोनचा वापर करतात त्यामुळं जंतूंचं प्रमाण त्यात जास्त असतं.

झोप पूर्ण करा: आपली झोप पूर्ण होणं हे सुद्धा चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. ७-८ तास झोपणं आवश्यक आहे. ताण विसरून फिट राहण्याचा प्रयत्न करा. भरपूर द्रव प्या... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.