www.24taas.com, कोलकाता
ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये सीरिजची दुसरी वनडे रंगणार आहे. सीरिजमध्ये 1-0 नं पिछाडीवर असणा-या टीम इंडियासाठी ही लढत करो वा मरो अशीच असणार. तर पाकिस्तानी टीम कोलकात्यातच सीरिज जिंकण्यासाठी आतूर असणार.
पाकिस्तानविरुद्ध मायदेशात सीरिज जिंकण्याचं स्वप्न पाहणा-य धोनी ब्रिगेड ईडन गार्डनवर उतरेल ते सीरिजमधील आव्हान कायम राखण्यासाठी. सीरिजमध्ये 1-0नं पिछाडीवर असणा-या भारतीय टीमसाठी ईडन गार्डवरील लढत करो या मरोची असणार..त्यात सेहवागचा हरवलेला फार्म, टॉप ऑर्डरची खराब कामगिरी यामुळे टीम इंडियाच्या चिंतेत भर पडलेली आहे..कॅप्टन धोनीला गवसलेला सूर ही काय ती टीम इंडियाच्या जमेची बाजू. जुनैद खान आणि मोहम्द इरफान या पाकच्या युवा फायर गन्सचा मुकाबला करण्याच आव्हान मुकाबला भारतीय बॅट्समनसमोर असणार. ईडन गार्डन्सवर भारताची वनडेतील कामगिरी समाधानकारक असली तरी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया इथे नेहमीच अपयशी ठरलीय. पाकिस्तानविरुद्ध भारतानं या मैदानात तिन्ही लढती गमावल्या.
त्यामुळे भारताला पकिस्तानविरुद्ध ईडन गार्डनवर जबरदस्त कामगिरी करावी लागणार.शिवाय फॉर्मात असलेले पाकिस्तानचे बॅट्समन नासीर जमशेद, युनिस खान आणि शोएब मलिकला रोखण्याचं आव्हान भारतीय युवा बॉलर्ससमोर असणार..भारत-पाकिस्तामधीस ईडन गार्डवरील ही लढत टफ होणार यात शंका नाही...