Sadabhau Khot Controversy: भाजपचे विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त विधान केलंय. खोतांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटलेत. तर राजकीय नेत्यांनीही सदाभाऊंचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे अखेर सदाभाऊंनी नरमाई घेत दिलगिरी व्यक्त केली. मात्र सदाभाऊच्या विधानामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
रयत शेतकरी संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बुधवारी सांगलीमधील जत येथे आयोजित महायुतीच्या सभेत बोलताना शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केली. “अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असा एकेरी उल्लेख करत खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.
जतच्या प्रचार सभेत शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरलीये. त्यांनी शरद पवारांच्या आजारावर आणि व्यंगावर जाहीर भाष्य केलं. सदाभाऊ यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. अजित पवारांनी सदाभाऊला चांगलंच सुनावलंय.अजित पवारांनी सुरुवातीला केलेल्या टीकेला सदाभाऊंनी उत्तर दिलं. ट्वीट काय करता? आभाळावर मोठ्या अक्षरात लिहा, अस आव्हानंच खोतांनी दिलंय.छगन भुजबळांसह विरोधकांनीही सदाभाऊ खोतांचा चांगलाच समाचार घेतला. तर खोतांना आवरा अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकेंनी दिलाय.
सदाभाऊ खोतांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन सुद्धा केलंय.. आंदोलनामुळे पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्याची वेळ सदाभाऊ खोतांवर आलीये..विरोध वाढत असल्याचं बघताच सदाभाऊ खोत यांनी आपल्या वक्तव्याबद्दल अखेर दिलगिरी व्यक्त केलीये..
सदाभाऊ खोतांनी दिलगिरी व्यक्त केली तरी हा विषय इथंच संपलेला नाही. मतपेटीतही याचे काही पडसाद उमटणार नाहीत याची खबरदारी महायुतीला घ्यावी लागणार आहे.
विरोधक असले तरी आपल्या काकांबद्दल केलेलं हे विधान अजित पवारांना भावलं नाही. त्यांनी थेट सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त केली. 'ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही," अशी पोस्ट अजित पवारांनी शेअर करत आपला विरोध नोंदवला.
सदाभाऊ खोत यांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. "राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत, विलासराव देशमुख, वसंतराव नाईक यासारख्या नेत्यांची परंपरा आहे. या वृंदावनामध्ये ही भांगेची रोपटी फडणवीसांनी लावली आहे. महाराष्ट्रात विष पेरण्याचं काम सुरु आहे. कधी तो पडळकर कधी हे खोत गृहस्थ. तुमचं योगदान काय राज्यामध्ये? मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी? टीका करायला काही हरकत नाही लोकशाहीमध्ये. हे कोणत्या नशेत असतात? देवेंद्र फडणवीस फिदीफिदी हसतात? महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांचा जो तिरस्कार करतो तो यासाठीच," असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.
RWA
(20 ov) 125/5
|
VS |
BRN
126/3(18.1 ov)
|
Bahrain beat Rwanda by 7 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 139/7
|
VS |
BRN
140/1(15.1 ov)
|
Bahrain beat Malawi by 9 wickets | ||
Full Scorecard → |
QAT
(20 ov) 189/4
|
VS |
SDA
193/6(19.2 ov)
|
Saudi Arabia beat Qatar by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.