नोटबंदीनंतर ही १.३७ कोटी लोकं आयकर विभागाच्या रडारवर

नोटबंदीदरम्यान ज्यांनी ही काळापैशांची विल्हेवाट लावली अशी लोकं सुरक्षित आहेतच असं नाही. सरकारच्या रडारवर आता हीच लोकं आहेत. सरकार आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आयकर विभागाने अशा जवळपास १.३७ कोटी लोकांची यादी बनवली आहे. ज्यांनी टॅक्स नाही भरला आहे किंवा टॅक्स चोरी केल्याची ज्यांच्यावर शंका आहे.

Updated: Apr 7, 2017, 05:19 PM IST
नोटबंदीनंतर ही १.३७ कोटी लोकं आयकर विभागाच्या रडारवर title=

नवी दिल्ली : नोटबंदीदरम्यान ज्यांनी ही काळापैशांची विल्हेवाट लावली अशी लोकं सुरक्षित आहेतच असं नाही. सरकारच्या रडारवर आता हीच लोकं आहेत. सरकार आता अशा लोकांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आयकर विभागाने अशा जवळपास १.३७ कोटी लोकांची यादी बनवली आहे. ज्यांनी टॅक्स नाही भरला आहे किंवा टॅक्स चोरी केल्याची ज्यांच्यावर शंका आहे.

आयकर विभागाने 360 डिग्री प्रोफाइलिंग व्यवस्था सुरु केली आहे. विभागाच्या डेटा बेसमध्ये टॅक्सची चोरी करणाऱ्या अशा लोकांची यादी तयार केली जात आहे. टॅक्स चोरी करणाऱ्या लोकांचं वर्गीकरण केलं जात आहे. ज्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशा लोकांवर सरकार नजर ठेवून असणार आहे.