आयकर विभागाने पकडली १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी

सरकारने काळापैशांबाबत मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मागील ३ वर्षांमध्ये १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी पकडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

Updated: Apr 7, 2017, 03:56 PM IST
आयकर विभागाने पकडली १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी title=

नवी दिल्ली : सरकारने काळापैशांबाबत मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मागील ३ वर्षांमध्ये १.३७ लाख कोटींची टॅक्स चोरी पकडल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार काळापैशांविरोधातील कारवाईला अजून गती देण्यात आली आहे. टॅक्स चोरी करणाऱ्यांना हा इशारा आहे की त्यांना यासाठी मोठा दंड भरावा लागणार आहे.

नोटबंदीनंतर सरकारला या विरोधात कारवाई करण्यासाठी आणखी मदत मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी काळापैसा बाळगणाऱ्या लोकांविरोधात कारवाई होणारच असं म्हटलं आहे. सरकार देखील या विरोधात कारवाई करण्यासाठी तयारी करत आहे.