१०० कोटींचा निधी ब्राह्मण समुदायाच्या कल्याणासाठी

तेलंगणा सरकारने या वर्षी ब्राह्मण समुदायासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ब्राह्मण समुदायाच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Updated: Mar 13, 2016, 06:40 PM IST
१०० कोटींचा निधी ब्राह्मण समुदायाच्या कल्याणासाठी  title=

हैदराबाद : तेलंगणा सरकारने या वर्षी ब्राह्मण समुदायासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. ब्राह्मण समुदायाच्या कल्याणकारी योजनांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा सरकार ब्राह्मणांच्या कल्याणासाठी अधिकाधिक सकारात्मक निर्णय घेणार आहे, असे संकेत दिले होते. 

ब्राह्मण समुदायाने राव यांना नुकत्याच झालेल्या ग्रेटर हैदराबादच्या महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये भरभरुन मतदान केले होते, असं म्हटलं जातं. 

राजधानी हैदराबाद येथे ब्राह्मण भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राव यांच्यातर्फे याआधीच करण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयाचे ब्राह्मण समुदायातर्फे स्वागत करण्यात आले आहे.

आंध्र प्रदेश सरकारनेही ब्राह्मण प्राधिकरणाची स्थापना केली आहे. यात ब्राह्मण समुदायासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.