उज्जैन : ५ हजार किलो द्रव्यापासून तयार केली गेलेली १२१ फुटाच्या अगरबत्तीला रविवारी संध्याकाळी प्रज्वलीत करण्यात आलं. यामुळे संपूर्ण भागात सुंगध पसरला आहे.
गायचं शेण, गोमूत्र, चंदन, गंगा जल, हिमालयातील २७ औषधी वनस्पतींपासून ही अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. गो माताच्या रक्षणाचा संदेश देण्यासाठी ही अगरबत्ती बनवण्यात आली आहे.
संपूर्ण सिंहस्थापर्यंत ही अगरबत्ती प्रज्वलीत राहणार आहे. गोमातेला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळेस ८ क्विंटलच्या बेसनचे लाडू देखील प्रसाद म्हणून वाटण्यात आले.