१६० वर्षांनंतर ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेट

तुम्ही विचार करु शकता ट्रेनच्या लांबच्या प्रवासाला ट्रेनमध्ये जर टॉयलेटचं नसतील तर काय होईल? गेली १६० वर्षे ६० हजार ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेटच नाहीत. गेल्या काही वर्षांपासून या प्रश्नावर चालकांचा लढा सुरु होता. अखेर चालकांच्या लढ्याला यश आलयं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते रेल्वे प्रशासनानं पहिल्यांदाच ट्रेनच्या इंजिनमध्ये बायो- टॉयलेट बसवले आहेत.

Updated: May 8, 2016, 12:33 PM IST
१६० वर्षांनंतर ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेट title=

नवी दिल्ली : तुम्ही विचार करु शकता ट्रेनच्या लांबच्या प्रवासाला ट्रेनमध्ये जर टॉयलेटचं नसतील तर काय होईल? गेली १६० वर्षे ६० हजार ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेटच नाहीत. गेल्या काही वर्षांपासून या प्रश्नावर चालकांचा लढा सुरु होता. अखेर चालकांच्या लढ्याला यश आलयं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते रेल्वे प्रशासनानं पहिल्यांदाच ट्रेनच्या इंजिनमध्ये बायो- टॉयलेट बसवले आहेत.

कित्येक वर्ष बऱ्याच ट्रेनच्या चालकांनी मागणी करुनही त्यांना टॉयलेटची सुविधा देण्यात आली नव्हती आणि रेल्वे प्रशासनाकडे मागणी केल्यास असे सांगण्यात आलं की ट्रेन चालकाला ट्रेन सुरु असताना टॉयलेटला जाण्याचा अधिकार नाही. नंतर रेल्वे चालकांनी केंद्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. त्यात त्यांनी रल्वे प्रशासन ट्रेन चालकांसोबत अत्यंत निर्दयीपणे वागत आहेत अशी तक्रार केली.

बायो-टॉयलेटमधील महत्त्वाच्या गोष्टी

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, बसवलेल्या बायो-टॉयलेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर आणि नवीन गोष्टी बसवण्यात आल्या आहेत. तसेच ट्रेनचा स्पीड कमी असताना या टॉयलेटचा दरवाजा उघडला जाईल.

कोणत्या अटी

ट्रेन सुरु असताना ट्रेन चालकांना या टॉयलेटचा वापर करता येणार नाही. तसेच दिल्ली मेट्रो ट्रेनमध्येही चालकाला प्रत्येक तीन तासानंतर ४० मिनिटांचा ब्रेक मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.