'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग'

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 

Updated: May 7, 2016, 08:39 PM IST
'मोदी-सोनियांमध्ये सेटिंग' title=

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये सोनिया गांधींना अटक करायची हिंमत मोदींमध्ये नाही, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये सेटिंग झालं असल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला आहे. 

ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी भाजप सरकार सोनिया गांधींना अटक करणार नाही आणि पंतप्रधानांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस बोलणार नाही, कारण या दोघांचं साटलोटं झालं असल्याचं केजरीवाल म्हणाले आहेत. 

ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून आपनं दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन केलं. या आंदोलनात केजरीवालांसह आपचे नेते सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना केजरीवालांनी काँग्रेस आणि भाजपवर हे आरोप केले आहेत.