जावडेकरांना कॅबिनेटमंत्रीपद, आठवले आणि भामरेंना राज्यमंत्रीपद

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज तिसरा विस्तार झालाय. या विस्तारात मंत्रिमंडळात २० जणांचा शपथविधी पार पडला. 

Updated: Jul 5, 2016, 12:12 PM IST
 जावडेकरांना कॅबिनेटमंत्रीपद, आठवले आणि भामरेंना राज्यमंत्रीपद title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज तिसरा विस्तार झालाय. या विस्तारात मंत्रिमंडळात २० जणांचा शपथविधी पार पडला. 

पुण्यातले राज्यसभा खासदार आणि विद्यमान पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आलीय. तर धुळ्याचे भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे आणि रिपाईचे खासदार रामदास आठवले यांना राज्यमंत्री समावेश झालाय. 

याशिवाय एम. जे. अकबर, अर्जूनराम मेघवाल, अनिल माधव दवे, रमेश चंद्प्पा, पुरुषोत्तम रुपाला, जसवंत सिंह भाभोर, एम एन पांडे, फग्गन कुलस्ते, विजय गोयल आणि अनुप्रिया पटेल यांचाही समावेश झालाय.  आजच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाच्या खातेवाटपातही मोठे फेरबदल होतील.