नवी दिल्ली : लश्कर-ए-तय्यबा ही दशहदवादी संघटना दिल्लीमध्ये मोठे हल्ले करू शकते असा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला आहे. दुजाना आणि ओकासा हे दोन दहशदवादी सीमाभागातून भारतात घुसले असल्याची माहितीही सुरक्षा यंत्रणांनी दिली.
लश्कर-ए- तयबाचे हे दोन्ही दहशदवादी अनेक दिवसांपासून काश्मिर घाटीत राहत असून भारतातील व्हीव्हीआयपी लोकांना मारण्यासाठी आणि गर्दीच्या ठिकाणी ग्रेनेड हल्ला करण्यासाठी योजना आखत आहेत.
वीवीआयपी आणि शहरातील अतिशय गर्दीची ठिकाणं हे या दहशदवाद्यांच्या निशान्यावर आहेत. लश्कर-ए-तय्यबा ही दहशदवादी संघटना भारतात दहशदवादा कारवाया करण्याच्या तयारीत आहेत आणि त्यासाठी दहशदवाद्यांना जम्मू-काश्मिर आणि इतर सीमाभागातून भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहण्याचा आणि धोक्याचा लवकरात लवकर तपास लावण्याचे निर्देश दिले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.