सीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान

छत्तीसगडच्या बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवेर तब्बल ९६ तास चालेल्या सीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. या ऑपरेशनमध्ये कोबरा पथक , जिल्हा पोलिस दल, आणि सीआरपीएफचे जवान सामील होते.

Updated: May 18, 2017, 10:03 AM IST
सीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान title=

रायपूर : छत्तीसगडच्या बीजापूर आणि सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवेर तब्बल ९६ तास चालेल्या सीआरपीएफच्या ऑपेरेशन जलेबीमध्ये २० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. या ऑपरेशनमध्ये कोबरा पथक , जिल्हा पोलिस दल, आणि सीआरपीएफचे जवान सामील होते.

ऑपरेशनमध्ये 2 जवान जखमी देखील झालेत. सुरक्षा रक्षकांनी चक्रव्यूहाची रचना करून नक्षलवाद्यांना घेरलं आणि गेल्या महिन्यात झालेल्या हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन दरम्यान वायूसेनेच्या हेलिकॉप्टर्सनी आपल्या जवानांची खाण्यापिण्याची रसद पुरवली. तब्बल १५० नक्षलवाद्यांना घेरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.