मिदनापूर, पश्चिम बंगाल: बंगालच्या मिदनापूरमध्ये एका चार वर्षाच्या मुलाच्या पोटातून मृत गर्भ निघालाय. या घटनेनं सामान्यच नाही तर डॉक्टरही हैराण झाले आहेत. डॉक्टरांनी या घटनेला मेडिकल सायंसमधील अतिशय दुर्मिळ घटना म्हटलंय. अशी केस सहा लाख लोकांमध्ये एखादवेळेस आढळून येते.
डॉ. शीर्षेंदू गिरी यांनी सांगितलं, मुलाच्या पोटात खूप दुखत होतं म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं गेलं. सुरूवातीला आम्हाला ट्युमर असल्याचा संशय होता. पण अल्ट्रासोनोग्राफी आणि सीटी स्कॅन केल्यानंतर मुलाच्या पोटात चक्क मृत गर्भ असल्याचं आढळलं.
रविवारी रात्री ऑपरेशन करून मुलाच्या पोटातील मृत गर्भ काढण्यात आलं. गर्भाचं हात, पाय, नखं आणि डोकं विकसित झालं होतं. बीनपूरच्या खरिकाबंद गावातील हा चिमुरडा आता बरा आहे.
असं का होतं?
जेव्हा गर्भावस्थेत जुळी मुलं असतील. त्यांची नाळ एक असेल तर असं होऊ शकतं. नाळेद्वारे एका गर्भात दुसरा गर्भ प्रवेश करतो. एका मुलाच्या जन्मानंतर तो गर्भ मुलाच्या पोटात राहतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.