संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात

 नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.

Updated: Nov 21, 2016, 06:26 PM IST
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवसही पाण्यात

नवी दिल्ली :  नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय. त्यामुळं हिवाळी अधिवेशनातला कामकाजाचा चौथा दिवसही पाण्यात गेलाय.

16 नोव्हेंबर 2016

- शोकप्रस्तावामुळं लोकसभा तहकूब

- राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारवर हल्ला

- राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

17 नोव्हेंबर 2016

- नोटांबदीवरून दुसरा दिवसही वाया

- काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानं गोंधळ

- पंतप्रधानांनी उत्तर द्यावं, यासाठी राज्यसभेतही गदारोळ

- गोंधळामुळं दिवसभराचं कामकाज तहकूब

18 नोव्हेंबर 2016

- लागोपाठ तिसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ

- आझाद यांच्या वक्तव्यावरून राज्यसभेत तणाव

- गोंधळामुळं संसदेचं कामकाज तहकूब

नोटाबंदीवरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेला आणि सोमवारी दुसऱ्या आठवड्याची सुरूवातही गोंधळातच झाली. विरोधकांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहांचं कामकाज लागोपाठ चौथ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. नोटाबंदीनंतर बँकांसमोर लागलेल्या रांगांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्याची मागणी काँग्रेसनं राज्यसभेत केली तर विरोधकांना चर्चा नकोय, तर केवळ गोंधळ घालायचाय, असा पलटवार अरूण जेटलींनी केला. 

नोटांबंदीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारची कोंडी केलीय. नोटाबंदीचा निर्णय देशासमोर जाहीर करणाऱ्या पंतप्रधान मोदींनीच सभागृहात उत्तर द्यावं, यासाठी राज्यसभेत विरोधक अडून बसलेत. मोदी पळ काढत असल्याची टीका मायावती यांनी केली तर नोटांबंदीचा निर्णय इतरांना आधी कसा कळला? याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसनं लोकसभेत केलीय. 

नोटाबंदीवरून सर्व विरोधक मोदी सरकारच्या विरोधात एकवटलेत. पण या राजकीय वादावादीत अधिवेशनाचं महत्त्वाचं कामकाज वाया जातंय, त्याचं काय? हा खरा सवाल आहे.