सरकारी नोकरीत सात लाख पदं रिक्त

केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे ज्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. ५६ मंत्रालये आणि  विभागांमध्ये तब्बल सात लाख पदे रिक्त आहेत. 

Updated: Nov 26, 2015, 01:15 PM IST
 सरकारी नोकरीत सात लाख पदं रिक्त title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडे कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे ज्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. ५६ मंत्रालये आणि विभागांमध्ये तब्बल सात लाख पदे रिक्त असल्याचं नुकतंच समोर आलंय. 

ज्याप्रकारे सरकारी कंपन्या आणि मंत्रालयांमध्ये कामाचा विस्तार होतोय ते पाहता रिक्त पदे वेळेत भरली न गेल्यास त्याचा परिणाम कामकाजावर होईल असे सेंट्रल स्ट्रॅटेजिक खात्यानं म्हटलंय.

२०१४ पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या मागणीच्या तुलनेत १९ टक्के कमी होती. तर तब्बल ८ मंत्रालयांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त होत्या. याचा अर्थ जितक्या कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यातुलनेत भर्ती करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे.

भरती प्रक्रियेतील बदललेल्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. दरवर्षी तीन टक्के कर्मचारी निवृत्त होतात. मात्र त्याच्या तुलनेत भर्तीचे प्रमाण केवळ एक टक्के आहे. यामुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे लवकरच या विविध पदांवर भरतीची होण्याची शक्यता आहे.

गेल्या सरकारच्या कार्यकाळात अनेक ठिकाण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भर्ती करण्यात आल्याने आता ही पदे रिक्त आहेत. तसेच सरकारी खर्च टाळण्यासाठीही भरती केली जात नाही. मात्र, यामुळे कामकाजावर परिणाम होतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.