आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी

असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.

Updated: Nov 26, 2015, 02:17 PM IST
आमिरच्या पत्नीवर टीका करताना घसरली भाजप नेत्याची पातळी title=

कानपूर : असहिष्णुतेच्या मुद्यावर आमिरनं केलेल्या वक्तव्यानंतर त्याच्यावर आणि त्याची पत्नी किरण राव हिच्यावर चहुबाजुंनी टीका झाली. याचविषयी बोलताना मात्र एका नेत्याची पातळी घसरली.

आमिर आणि किरणवर टीका करताना भाजप नेते सतीश महाना यांची जीभ घसरलीय... 'कदाचित किरणला अमेरिकेच्या एअरपोर्टवर कपडे उतरवून तपासणी करून घ्यायचीय' असं लज्जास्पद वक्तव्य महाना यांनी केलंय. 

नुकतंच, आपली पत्नी किरणनं देशातील वाढत्या असहिष्णुतेवरून आणि मुलांच्या सुरक्षेवरून चिंतीत होती, त्यामुळे तिनं आपल्याला एका वेळी देश सोडून जाण्याचाही सल्ला दिला होता, असं वक्तव्य आमिर खाननं केलं होतं. गेल्या ६-८ महिन्यांपासून देशात असहिष्णुता वाढतेय, असं त्याचं म्हणणं होतं. 

यावरच उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्याचे भाजपचे आमदार सतीश महाना टीका करत होते. 'आमिर खानची पत्नी किरण रावला अमेरिकेत जाऊन स्थायिक होण्याची इच्छा असेल. कदाचित अमेरिकेच्या एअरपोर्टवर कपडे उतरवून तपासणी करून घ्यायचीय, म्हणून तिला अमेरिकेला जायचं असेल' असं निंदनीय वक्तव्य महाना महाशयांनी केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.