बेळगावात सापडले ७२ बॉम्ब

जिल्ह्यातील संकेश्वर शहराजवळ २५ लाँचिंग बॉम्ब आणि ४७ इतर बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडालीय.

Updated: Mar 9, 2016, 10:25 AM IST
बेळगावात सापडले ७२ बॉम्ब title=

बेळगाव : जिल्ह्यातील संकेश्वर शहराजवळ २५ लाँचिंग बॉम्ब आणि ४७ इतर बॉम्ब सापडल्यानं एकच खळबळ उडालीय.

या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक राज्य हदरून गेलंय. विहिरीतली गाळ उपसतानाही हे बॉम्ब सापडले. पोलिसांनी ही सर्व बॉम्ब ताब्यात घेतले असून यापैकी काही बॉम्ब जिवंत असण्याची शक्यता आहे. 

या घटनेची माहिती मिळताचं लष्करातील वरिष्ठ अधिकारीही संकेश्वरमध्ये दाखल झालेत. हे बॉम्ब विहिरीत कुणी टाकले याचा शोध लागणं गरजेचं आहे.