मोदींच्या मंत्रिमंडळात 78 पैकी 72 मंत्री करोडपती

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. या विस्तारानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळातल्या 78 पैकी 72 मंत्री करोडपती आहेत. 

Updated: Jul 8, 2016, 08:25 PM IST
मोदींच्या मंत्रिमंडळात 78 पैकी 72 मंत्री करोडपती title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला आहे. या विस्तारानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळातल्या 78 पैकी 72 मंत्री करोडपती आहेत. या मंत्रिमंडळातल्या 24 मंत्र्यांवर अपराधिक गुन्हे दाखल आहेत. 

मंत्रिमंडळामध्ये 19 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली तर पाच मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. आता मोदींच्या मंत्रिमंडळात 78 मंत्री आहेत. 

दिल्लीतील असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेनं मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती प्रसिद्ध केली आहे. या मंत्र्यांची सरासरी संपत्ती 8.73 कोटी रुपये आहे. 

एडीआरच्या रिपोर्टनुसार नवनिर्वाचित मंत्री आणि राजस्थानमधून राज्यसभेवर गेलेले एम.जे.अकबर यांच्याकडे 44.90 कोटी रुपयांची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावर पी.पी.चौधरी (35.35 कोटी रुपये), तिसऱ्या क्रमांकावर विजय गोयल (29.97 कोटी रुपये) हे मंत्री आहेत. 

मंत्रिमंडळामध्ये नऊ मंत्र्यांकडे 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. यामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली (113 कोटी रुपये), हरसिमरत कौर बादल (108 कोटी रुपये), पियुष गोयल(95 कोटी रुपये) यांचा समावेश आहे. 

मंत्रिमंडळातल्या तीन मंत्र्यांचं वय हे 31 ते 40 एवढं आहे. 44 मंत्री 41 ते 60 वयामधले आहेत, तर 31 मंत्री 61 ते 80 वर्षांचे आहेत.