झाबुआ : मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यात पटेलावद येथील हॉटेलमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोट दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढलाय. मृतांची संख्या ८२ वर पोहोचली आहे.
सिलिंडरचा स्फोट इतका भयंकर होता की, इमारतीचे छतच कोसळले. आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन अनेक लोक जखमी झालेत. जखमींना इंदोर आणि रतलाम रेफर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी चौकशीचे आदेश दिलेत.
दरम्यान, सकाळच्यावेळी हॉटेलमध्ये अनेक लोक नास्ता करण्यासाठी आले होते. त्याचवेळी सिलिंडर स्फोट झाल्याने ही मोठी दुर्घटना घडला. बळींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हॉटेल नविन बस स्टॅंडच्या जवळ आहे. हॉटेलमध्ये सिलिंडर स्फोट झाला. यावेळी इमारतीचे छत कोसळले. छताच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान चौकशीचे आदेश दिल्यामुळे ही घटना कशी घडली याची माहिती मिळेल, असे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.