9 नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

जेएनयुमधल्या वादाप्रकरणी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल सीताराम येचुरी यांसारख्या एकूण 9 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Updated: Feb 29, 2016, 09:17 AM IST
9 नेत्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल title=

नवी दिल्ली : जेएनयुमधल्या वादाप्रकरणी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल सीताराम येचुरी यांसारख्या एकूण 9 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यामध्ये काँग्रेस नेते आनंद शर्मा, अजय माकन तसंच सीपीआयचे डी राजा, जेडीयूचे के.सी. त्यागी, जेएनयुएसयुचा प्रेसिडेंट कन्हैया कुमार, उमर खालिद यांचीही नाव यामध्ये आहेत.

 हैदराबादच्या सरुरनगर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकिल जनार्दन गौड यांनी या सगळ्यांनी देशद्रोह केल्याची तक्रार सरुरनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. पण पोलिसांनी गुन्हा नोंदवायला नकार दिल्यामुळे गौड न्यायलायत गेले.

त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं या सगळ्यांवर गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.