कर्नाटकात ९ संशयित दहशतवादी अटक

कर्नाटकात आज ९ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आलं. हे सर्व संशयित इंडियन मुजाहिद्दीनचे सदस्य असल्याची शक्यता आहे, असं सांगण्यात येत आहे. यापैकी ५ जण हुबळीमधून तर ४ जण बंगळुरूमधून पकडले गेले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 30, 2012, 01:39 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
कर्नाटकात आज ९ संशयित आतंकवाद्यांना अटक करण्यात आलं. हे सर्व संशयित इंडियन मुजाहिद्दीनचे सदस्य असल्याची शक्यता आहे, असं सांगण्यात येत आहे. यापैकी ५ जण हुबळीमधून तर ४ जण बंगळुरूमधून पकडले गेले.
संशयितांचं सामानही जप्त करण्यात आलं आहे. यात बरेच लॅपटॉप मिळाले आहेत. अजून यासंदर्भात बाकी माहिती देण्यास पोलिसांना वेळ लागणार आहे.
छापे टाकून या सर्व संशयितांना पकडण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे हुबळी आणि बंगळुरूमध्ये या संशयितांवर धाड टाकली. अत्यंत सावधपणे केलेल्या मिशनमुळे हे संशयित जेरबंद झाले. या ९ संशयितांमध्ये १ पत्रकारही आहे. हा पत्रकार एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये काम करतो.