www.24taas.com, झी मीडिया, गाझियाबाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गाझियाबाद कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. त्यामुळं आता पुन्हाराज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार फिरू लागलीय.
चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल गाझियाबादच्या महानगर दंडाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलाय. राज यांनी बिहारी जनतेविरोधात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप करत एका वकीलानं त्यांच्याविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे.
अॅड. देवलाल प्रसाद यांनी १२ सप्टेंबर २०१२ रोजी राज यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली असता राज ठाकरे सुनीवणीस हजर न राहिल्यानं कोर्टानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढला आहे. न्या. राम करण यादव यांनी हा वॉरंट जारी केला असून याप्रकरणी पुढील सुनावणी ३० जून रोजी होणार आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंना अटक होणार का? असा प्रश्न विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.