झारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं

झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. झारखंडच्या ८१ पैकी ४० जागा जिंकून भाजपनं जवळपास बहुमताचा आकडा गाठलाय.

Updated: Dec 23, 2014, 08:00 PM IST
झारखंडमध्ये भाजपचं कमळ फुललं title=

रांची : झारखंडमध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय. झारखंडच्या ८१ पैकी ४० जागा जिंकून भाजपनं जवळपास बहुमताचा आकडा गाठलाय.

भाजप आणि मित्रपक्ष असं सरकार झारखंडमध्ये सत्तेवर येणार, हे आता स्पष्ट झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट अजूनही कायम असल्याचं झारखंडच्या निकालांनी स्पष्ट केलंय.

तर मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला १८ जागांवर विजय मिळालाय. काँग्रेसचा मात्र झारखंडमध्येही पुरता सफाया झालाय. काँग्रेसला जेमतेम ६ जागा जिंकता आल्यात. तर झारखंड विकास मोर्चालाही ६ जागा मिळाल्यात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.