मणिपूरमध्ये आज भाजपची अग्निपरीक्षा

आज मणिपूरमध्ये भाजपची अग्नि परीक्षा असणार आहे. एन बीरेन सिंह सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे. मुख्यमंत्री एन. बीरेन यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार शक्ति प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण विधानसभेचं लगेचच सुरु होऊ शकेल. सगळ्यात वरिष्ठ सदस्य एस बीरा यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Updated: Mar 20, 2017, 09:01 AM IST
मणिपूरमध्ये आज भाजपची अग्निपरीक्षा title=

इंफाळ : आज मणिपूरमध्ये भाजपची अग्नि परीक्षा असणार आहे. एन बीरेन सिंह सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे. मुख्यमंत्री एन. बीरेन यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार शक्ति प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण विधानसभेचं लगेचच सुरु होऊ शकेल. सगळ्यात वरिष्ठ सदस्य एस बीरा यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपला मणिपूरमध्ये ६० पैकी २१ जागा मिळाल्या आहेत आणि त्यांनी नॅशनल पीपल्स पक्ष आणि नागा पीपल्स फ्रंटचे चार-चार आमदार आणि  अपक्षांच्या मदतीने बहुमताचा आकडा गाठला आहे.

इबोबी सिंह यांच्या नेतृत्वात काँग्रेस २८ जागा मिळवत मोठा पक्ष ठरला आहे. पण ते बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे १५ वर्षानंतर मणिपूरमध्ये सत्ता परिवर्तन होत आहे.