नवी दिल्ली : भूतानचे काही पदाधिकारी राज्यसभेच्या प्रेक्षागॅलरीत हजर होते, त्यांची ओळख सभापतींनी करून दिली. यानंतर त्यांचा येथे येण्याचा उद्देश काय आहे, हे देखील त्यांनी सांगितलं.
भूतानचे हे पदाधिकारी आपल्या संसदेचं कामकाज कसं चालतं हे पाहण्यासाठी आले असल्याचं जेव्हा सभापतींनी सांगितलं, तेव्हा राज्यसभेतले खासदार खोखो हसले, आणि हे पाहून भूतानचे पदाधिकारी हिरमुसले, पण चेहऱ्यावर हास्य खुलवत खाली बसले, यानंतर पुन्हा सुरू झाला तो राज्यसभेतला गोंधळ, आणि पुन्हा हाऊसचं कामकाज दोनपर्यंत तहकूब करण्यात आलं.
पाहा राज्यसभेतले ते तीन मिनिटं
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.