मोफत LPG नोंदणीसाठी यापुढे आधार कार्ड सक्तीचं

यापुढे गरीब महिलांना मोफत नवीन LPG कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय.

Updated: Mar 9, 2017, 12:54 PM IST
मोफत LPG नोंदणीसाठी यापुढे आधार कार्ड सक्तीचं title=

नवी दिल्ली : यापुढे गरीब महिलांना मोफत नवीन LPG कनेक्शनसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलंय.

भारत सरकारतर्फे नुकताच हा निर्णय जाहीर करण्यात आला. याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गॅस सिलेंडरवरच्या सबसिडीसाठी आधार कार्ड सक्तीचं करण्यात आलं होतं. 

देशातील काही गरीब ग्रामीण महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेनुसार एलपीजी कनेक्शन दिलं जातं. याच योजनेबद्दल हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी सुरु झालेल्या या योजनेतून ३ वर्षांत ५ करोड दारिद्र्य रेषेखालील महिलांना मोफत स्वयंपाकाचा सिलेंडर मिळवून देण्याचं ध्येय आहे.  

आधार कार्डसाठी अर्ज केल्यानंतरही या योजनेसाठी नोंदणी करता येऊ शकते. त्यांना फक्त आधार कार्डची पावती द्यावी लागेल.