नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे, कारण केंद्र सरकारच्या सर्व निवृत्त कर्मचा-यांना पेन्शन हवे असल्यास त्यांना आता आधार क्रमांक सक्तीचे केले आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी आपला आधार क्रमांक बॅँकेमध्ये द्यावा. अन्यथा त्यांना पेन्शन मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
निवृत्त वेतनधारकांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आधार क्रमांक बँकेकडे द्यावा. तसेच ही माहिती त्यांनी पेन्शन वितरण प्राधिकरणाकडे द्यावी. नोव्हेंबर २०१५ मध्ये हयातीचा दाखला देण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे कार्मिक व पेन्शन खात्याच्या अधिसूचनेत नमूद केले आहे.
पेन्शनधारकांना सहजपणे पेन्शन मिळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारचे ५० लाख निवृत्ती वेतनधारक आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने 'जीवन प्रमाण' ही 'आधार'वर आधारित डिजिटल सेवा सुरू केले आहे. या अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला देण्यासाठी बॅँकेमध्ये जाण्याची गरज उरणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.