नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे नेते नजीब यांना अटक केली आहे. २५ लाखांची लूट केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आपच्या या नेत्याला अटक केली आहे. सोबतच ५ आणखी लोकांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
एका व्यवसायकाकडून २५ लाख रुपये लूटल्याचा गंभीर आरोप यांच्यावर केला गेला आहे. जितेंदर, शबाब, नजीब, नदीम, नवेद आणि मोहम्मद यूसुफ अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सगळे दिल्लीच्या मौजपूरमध्ये राहणारे आहेत.
आरोपींनी १२ मार्चला बंदुकीचा धाक दाखवून व्यावसायिक विपूल जैन यांना लूटलं. जैन हे देखील मौजपूरचे राहणारे आहेच. या दरम्यान स्थानिकांनी यांचा पाठलाग देखील केला. पळत असतांना नदीमची बाईक घसरली. त्यानंतर त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं गेलं. नदीमने एक गोळी देखील चालवली. ज्यामध्ये एक जण जखमी झाला.