`आप`च्या कुमार विश्वासकडून अखेर जाहीर माफी

सत्तासुंदरी कुणाला काय काय करायला लावेल हे सांगता येत नाही, कारण आपचे नेते कुमार विश्वास यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीरमाफी मागितली आहे.

Updated: Jan 6, 2014, 02:22 PM IST

www.24taas.com, झी मीडीया, नवी दिल्ली
सत्तासुंदरी कुणाला काय काय करायला लावेल हे सांगता येत नाही, कारण आपचे नेते कुमार विश्वास यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीरमाफी मागितली आहे.
कारण जेडीयूचे आमदार शोएब इकबाल यांनी कुमार विश्वास यांनी मोहर्रम दरम्यान केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी केली होती.
जर कुमार विश्वास यांनी माफी मागितली नाही, तर आपण आप सरकारचा पाठिंबा काढून घेऊ, अशी तंबीही शोएब इकबाल यांनी आप सरकारला दिली होती. यावर कुमार विश्वास यांनी या प्रकरणी यापूर्वीच माफी मागितली असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.
मात्र त्यानंतर आज जेडीयू आमदार शोएब इकबाल यांनी कुमार विश्वास यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली, त्यानंतर कुमार विश्वास यांनी जाहीरमाफी मागितली आहे.
कुमार विश्वास यांनी ६ सप्टेंबर 2013 रोजी माफीमागून व्हिडीओ अपलोड केला होता. २००३ साली झालेल्या कवी संमेलनात कुमार विश्वास यांनी इमाम हुसैन आणि मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेलं वक्तव्य, वादग्रस्त ठरलं होतं.
दिल्ली विधानसभेत जेडीयूचा एक सदस्य आहे. दिल्लीत जेडीयूने आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे. ७० सदस्य असलेल्या दिल्ली विधानसभेत आपच्या २८ जागा आहेत, तसेच आपला काँग्रेसचे आठ आणि जेडीयूच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.