विमानातील पदार्थ घरी नेणाऱ्या एअर इंडिया कर्मचारी महिलेला पकडले

नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. 

Updated: Feb 1, 2016, 12:57 PM IST
विमानातील पदार्थ घरी नेणाऱ्या एअर इंडिया कर्मचारी महिलेला पकडले title=

नवी दिल्ली : सरकारी विमान कंपनी एअर इंडिया नेहमीच काही ना काही कारणांनी चर्चेत असते. आता ही कंपनी चर्चेत येण्याचं कारण आहे विमानातील एक कर्मचारी महिला.

कोलंबो - दिल्ली विमानातील एका एअर हॉस्टेसवर विमानातील अनेक पदार्थ आपल्या घरी नेल्याचा आरोप लागला आहे. विमानतळावर उतरल्यावर काहीतरी संशय आल्याच्या कारणावरून येथील ऑफिसर्सनी या महिलेच्या सामानाची पडताळणी केली. या पडताळणीत त्यांना विमानातील अनेक गोष्टी सापडल्या.

 

हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राच्या बातमीनुसार या महिलेच्या सामानात विमानात दिले जाणारे खाद्यपदार्थ, दुधाचे कार्टन, ज्यूसचे कॅन, कॉफीचे डब्बे तसेच काजू सारखा सुका मेवा यांसारखे अनेक पदार्थ सापडले आहेत. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या मते या महिलेने जे काही घरी नेणे शक्य असेल त्या सर्व गोष्टी बॅगमध्ये भरुन घेतल्या होत्या.